जिवन आनंदराव मावस (तालुका प्रतिनिधी)
ढोरेगाव ता.गंगापूर - शनिवारी रात्री झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरी आणि सोलेगाव येथील कित्येक लोकांच्या घरात पाणी घुसले आहे अनेकांचे संसार योग्य वस्तू खराब झालेले आहेत. शेतात अनेकांच्या पिकात पाणी शिरले आहे ,त्यामुळे खूप साऱ्या पिकांची नुकसान झाली आहे.या शिवारातील शेतकरी खूपच हवालदिल झाले आहेत.अनेक गावांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
पूर परिस्थिती बघता सोलेगाव येथील सरपंच संतोष पवार व काही ग्राम पंचायत च्या अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांना सुक्षितस्थळी हलवले आहे.पंचायत समिती माजी उपसभापती सुमित मुंदडा
तसेच भाजपा चे गंगापूर तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
लवकरच सोलेगाव आणि गंगापूर सर्कल मधील सर्व भागाची पाहणी करून पूरग्रस्त भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत प्राप्त करून देऊ असे आश्वासन देखील यावेळेस देण्यात आले.
या वेळी सोलेगाव येथील किशोर उमाप,किरण जगधने,शुभम साबळे यांनी काही ग्रामस्थांना हाती घेऊन लोकांना योग्य त्या ठिकाणी सुखरूप नेण्यास मदत केली.
0 Comments