दिलीप लोखंडे
टाकळीभान - प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या , टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . सुप्रिया प्रसाद कदम हिची तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये १७ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या .
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . सुप्रिया प्रसाद कदम हिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २४ सप्टेंबर २०२५ रोजी दिंडीगुल ( तामिळनाडू) येथे होणाऱ्या सब ज्युनियर नॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून तिची निवड झाली आहे .कु . सुप्रिया कदम हिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे , पर्यवेक्षक एस.एस जरे,व क्रीडा विभाग प्रमुख एस .एस . राठोड सर यांनी विशेष परिश्रम घेतले, टाकळीभान सेवा संस्थेचे चेअरमन मंजूबापू थोरात, माजी चेअरमन राहुल पटारे संदीप जावळे सर पत्रकार संघटना,व टाकळीभान मधील क्रीडा प्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे .
0 Comments