लोणी ( वार्ताहर )
भारत सरकार, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने संपूर्ण देशात पोषणमाह कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राहता तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राहाता, पंचायत समिती राहाता यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पोषणमहा अभियान 2025 अंतर्गत तालुकास्तरीय उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. सौ. शालिनीताई विखे पाटील या होत्या. यांनी पोषण आहार विषयक विचार मांडले. व पोषण महाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. महिलांचे आरोग्य, कुपोषण, किशोरवयीन मुलींनी घ्यावयाची काळजी, गरोदर मातांचा आहार याविषयी पीएमटी चे स्त्रीरोग तज् डॉ. बंगाल सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
पोषण अभियान हे 08 मार्च 2018 साली चालू झाले असून, यावर्षी 8 वा पोषणमाह 17 सप्टेंबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन श्री.रामदास गंभिरे, बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती राहाता यांनी असे आव्हान केले की,भारत देशात कुपोषण ही एक मोठी समस्या आहे,. यासाठी एक मोठे जनआंदोलन उभे करुन, एक निरोगी आणि सशक्त भारत घडविण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकु. आणि सर्वजण मिळून देश कुपोषण मुक्त करण्यासाठी एक जबाबदारी उचलून देशाला कुपोषण मुक्त करु.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातून सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या 200 पोषण पाककृती आहारांचा समावेश करुन आहार प्रात्यक्षिक भविण्यात आले होते. त्याचबरोबर तारा सेल्फी पॉईंट, पोषण बोगदा, पोषण सापशिडी, पोषणगुढी, पोषण मटका, पोषण परी, पोषण रांगोळी या कार्यक्रमाच्या विशेष प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय लोणी बु. या शाळेच्या विद्यार्थिनींनी लोणी गावातून पोषण रॅली काढून जनजागृती केली व अंगणवाडी सेविका यांनी संपूर्ण गावातून बाईक रॅली काढून उत्फूषणर्त प्रतिसाद नोदंविला.
तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांसाठी आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. पोषणमाह कार्यक्रमाच्या निमित्त उत्कृष्ट काम केलेल्या प्रकल्पातील 7 पर्यवेक्षिका व 12 अंगणवाडी सेविका तसेच इतर महिला कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments