नारायणगावच्या साईभक्ताने सुमारे 13 लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पायातील सुंदर कडे साईचरणी केले अर्पण!

शिर्डी ( राजकुमार गडकरी)श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे मंगळवार दिनांक ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी नारायणगाव, पुणे येथील रहिवाशी साईभक्‍त श्रीमती साधना  व सुनिल कसबे यांनी श्री साईचरणी १२३.४४० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्‍याचे कडे अर्पण केले .याची किंमत १३ लाख १२ हजार ५३८  रुपये असून हे सुंदर नक्षिकाम असलेले कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आले. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला.
 यावेळी देणगीदार यांचा परिवार व मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी देणगीदार साईभक्त सुनील कसबे यांनी सांगितले की, आपण एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो. मात्र साईबाबांच्या भक्तीत रममाण झाल्यानंतर बाबांनी सर्व सुख समाधान दिले. त्यामुळे शिर्डीला साईंच्या दर्शनाला परिवारासह येऊन दर्शन घेण्याचे,व दर्शनाने मोठा आनंद व समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगत बाबांना पायातील सोन्याचे कडे अर्पण केले .जणू ते बाबांनीच करून घेतले व मला बाबांनी पाय जवळच ठेवावे. हा उद्देश  ठेवूनच आपण बाबांना पायातील सोन्याचे कडे दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.व संस्थांनने दिलेल्या सहकार्याबद्दल साईसंस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब व सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

Post a Comment

0 Comments