चेन्नई येथून आलेल्या साई पालखी व पदयात्रांचे शिर्डीत संस्थान तर्फे स्वागत !

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीला अनेक साई पालख्या साई दर्शनासाठी महाराष्ट्र  राज्यातून व राज्याच्या बाहेरूनही अनेक साई पदयात्री साई पालखी घेऊन शिर्डीला पायी साईंचा जयजयकार करत शिर्डीतील उत्सव तसेच विविध सण उत्सवाच्या वेळी येत असतात.


 इतर वेळी ही साई पालख्या पदयात्री शिर्डीला सातत्याने येताना दिसतात. अशीच चेन्‍नई येथून पायी निघालेल्या २५ पदयात्री साईभक्‍तांची पालखी शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी पोहोचली. या प्रसंगी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अभियंता श्री. भिकन दाभाडे यांनी पदयात्रेकरूंचे स्वागत केले. तसेच साईसंस्‍थानच्‍या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. शिर्डीत हे चेन्नईहून आलेले सर्व साई पदयात्री साई दर्शनानंतर मोठे खुश दिसत होते. सर्वांनी आमची पदयात्रा यशस्वी साई कृपेने झाल्याबद्दल साईबाबांचे धन्यवाद मानत मोठे समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments