लोहगाव (वार्ताहर): पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा विभाग व प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथील तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी साईश सुनील बटवाळ यांनी ४१ किलो वजन गट स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर महात्मा गांधी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी अक्षरा कदम हिने ३२ ते ३५ वजन गटांमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, माधुरी वडघुले, प्रसिद्धी प्रमुख डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे आदींसह शिक्षक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रफुल्ल नव्हाळे, नरेंद्र ठाकरे, शुभांगी भरसाकळ आदींचे मार्गदर्शन लाभ.
0 Comments