टाकळीभान प्रतिनिधी- : महिला प्रामाणिकपणे प्रपंच सांभाळून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होत असून बचत गटामळे महिलांमध्ये आर्थिक क्रांती घडून येत असल्याने महिला बचत गटांना संपूर्ण सहकार्य करुन महिलांना सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन आ. हेमंत ओगले यांनी केले.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात श्रीरामपूर तालुका पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व समुदाय निधी वाटप मेळ्याव्यात ओगले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, टाकळीभान सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, आदी प्रमुख उपस्थित होते.
आ. ओगले पुढे म्हणाले की, महिला बचत गटांनी चांगली आर्थिक क्रांती केली आहे. प्रपंच सांभाळून महिला बचत गट चालवून बचत गटाच्या माध्यमातून माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय करुन अर्थार्जन करीत आहेत. त्यामुळे महिला बचत
गटांना यापुढील काळात संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली
महिला बचत गटांना सहकार्य करणार : आ. हेमंत ओगले
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे यांनी महीला बचत गटासाठीच्या विविध योजनांची माहीती देऊन लाभ घेण्याचे अवाहन केले. यावेळी टाकळीभान जिल्हा परिषद गटातील सहा सक्षम बचत गटांनी प्रत्येकी १० लाख रुपये या प्रमाणे ६० लाखाच्या धनादेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जयश्री दहातोंडे, चेतना गायकवाड, वैशाली कटारे, दिपाली मगर, किरण शेरे, अशोक रासकर ,लक्ष्मी डांगे, अर्चना कोकणे, मनीषा जोशी आशा धनवटे, योगिता राऊत, जयश्री सलालकर काजल दौंड, हुरबाना शेख, लता कर्जुले, कविता तरहाळ छाया बोडखे, सोनल बोरसे, गीता शितोळे, आदी सह टाकळीभान, भोकर, खोकर, कारेगाव, वडाळा महादेव, निपाणी वडगाव, मातापूर येथील बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शिरसाठ यांनी केले,
0 Comments