टाकळीभान प्रतिनीधी - उत्तर प्रदेशातील बागपत येथे वात्सायन पॅलेस मध्ये नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलनामध्ये अहित्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भोकरचे पत्रकार हरिभाऊ बिडवे, काष्टी श्रीगोंदा येथील लक्ष्मण जगताप, तसेच सालवडगांव, शेवगांवचे किरण वीर यांना ट्रॉफी, प्रमाण पत्र देवुन गौरव करत सन्मानीत करण्यात आले.
आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमाचे बेस्ट रिपोर्टींग पुरस्कार लक्ष्मण जगताप व किरण वीर यांना उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून ट्रॉफी व मेडल देत सन्मानीत करण्यात आले. उत्तर प्रदेशातील बागपत येथील रेडिओ श्रोता संमेलनात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, दिल्ली, इत्यादी राज्यातील रेडिओ श्रोते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नेपानगर मध्यप्रदेशचे सुदर्शन शाह तर विशेष पाहुणे आनंद जोशी, मास्टर एस के पाटील, बलवंत कुमार वर्मा, संजय ढिंगीया, यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी परशराम साहु गुरुजी यांनी २०२६ चे अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलन भिलाई छत्तीसगड येथे होणार असल्याची घोषणा केली
अखिल भारतीय श्रोता संम्मेलन प्रसंगी विविध राज्यांतील अनेक आकाशवाणी उद्घोषक उपस्थित होते., त्यापैकी प्रमुख म्हणजे ऑल इंडिया रेडिओ ऊर्दू सेवा दिल्लीचे इरफान आझमी, तारिक जमील, मुंबई विविध भारती शेफाली कपूर, रेडिओ धड़कन दिल्ली नीता अग्रवाल, ललीत कुमार, आकाशवाणी दिल्ली, इष्टय मीर, गायत्री आचार्य, दया स्वराना राणी, हरि प्रिया संजा शर्मा, हरी प्रिया संजय शर्मा, जग्रपुरे, मृण्मयी, रेडिओ बर्फीचे मधुर तिवारी, रायपुर आकाशवाणीचे सशांक खरे, देवेंद्र रावत, बरेली आकाशवाणीचे गजेंद्र यादव, नवीन भारद्वाज, प्रदीप कुमार आदी उद्घोषकांनी याप्रसंगी उपस्थित राहून श्रोत्यांना मार्गदर्शन करत रेडिओ संमेलनाचा आनंद घेतला
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील मा.एस के पाटील, लक्ष्मण जी जगताप, हरीभाऊ बिडवे, किरण विर, राजकुमार वानखेडे, नरेद्र नरवाडे, शब्बीर हुशेन, नरेद्र मीरगे राजेश खोबरखेडे, सहदेव दामोदर, हिरामन शेंडे, नारायण हागे, किशन सपकाळ, सुरेश जाधव, शहाजी बोडखे, अमोल मानकर, श्रीकृष्ण बाठे, सिद्धार्थ गौंडाने, काशीनाथ ढेंगे पाटील, शिवाजी उगले, संजय पाटील, भागवत देठे, नगिनदास बैरागी, गणेश भवरे, आत्माराम पाटील, अनिता गाठोडे,. ज्योती नरवाडे, यांचेसह विविध राज्यातील अनेक श्रोते यावेळी उपस्थीत होते.
उत्तर प्रदेशातील अखिल भारतीय संमेलन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष संजय ढिंगीया, सुखविंदर सिंह जौडा, ज्ञानभूषण शर्मा, बिजेद्र जयजान, रविकुमार राहुल,यांचेसह टिमने अतिशय परिश्रम घेतले.
0 Comments