श्रीरामपूर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या बदलीसाठी छावा ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले मुळा पाटबंधारे मध्ये चालू असलेले भ्रष्टाचाराचे सखोल चौकशी करण्यात यावी उपविभागीय कार्यालयाचे दुरुस्ती च्या कामे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तसेच माहिती अधिकारात माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ करणे कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणे म्हणून सर्व कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावे झालेल्या कामाचे कोर टेस्टिंग करण्यात यावे असे निवेदन देताना छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ,प्रदेश महासचिव राहुल रेळे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख एजाज पठाण,जावेद सय्यद व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments