येथील मोठी परंपरा असणाऱ्या या अखंड हरीनाम सप्ताह निमित्त दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण, त्यानंतर गाथा भजन, वारकरी भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व नऊ ते 11 कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम दररोज संपन्न झाले. येथे किर्तन महोत्सवामध्ये ह भ प हेमलता ताई पिंगळे महाराज, ह भ प संजयजी महाराज जगताप, भऊरकर ,ह भ प निवृत्ती महाराज देशमुख ,इंदुरीकर, ह भ प गोरक्षनाथ महाराज देठे, ज्ञानेश्वर महाराज शिंदे ,ह भ प श्रीकांत महाराज साखरे, यांनी ह भ प विठ्ठलपंत गोंडे महाराज, ह भ प नित्यानंदगिरीजी महाराज, यांचे नऊ ते अकरा यादरम्यान दररोज किर्तन संपन्न झाले. त्यानंतर बुधवार सहा ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते एक या दरम्यान ह भ प पांडुरंग महाराज गिरी यांचे सुश्राव्य असे काल्याचे किर्तन संपन्न झाले. कीर्तनानंतर महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी महाराजांच्या हस्ते येथील दानशूर ग्रामसेवक सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रीमती नादराबाई देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाविकांना महाप्रसाद वाढण्याचे महत्त्वाचे व मोठे काम केले. तत्पूर्वी दहीहंडी फोडल्यानंतर काल्याचा प्रसाद ट्रॅक्टर मधून भाविकांना वाटण्यात आला. या सप्ताह कार्यक्रमानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीतेसाठी समस्त रुई ग्रामस्थ, सप्ताह कमिटी,भजनी मंडळी ,तरुण मंडळ, भाविकांनी मोठे परिश्रम घेतले. बुधवार सहा गोष्ट रोजी रात्री नऊ वाजता ह भ प गोविंद महाराज गायकवाड यांचा प्रसिद्ध भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी या भारुड कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व सप्ताह कमिटीने केले आहे.
0 Comments