गोविंदसागर हे पर्यटन स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणार - अविनाश अदिक



टाकळीभान- प्रतिनिधी - टाकळीभान येथील टेल टॅंक उर्फ गोविंद सागर हा पर्यटन स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार  गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश दादा आदिक यांनी केले .
          टेल टँकचे जलपूजन माजी आ.लहू कानडे व अविनाश दादा आदिक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आदिक बोलत होते.  
          टाकळीभान येथील पंचक्रोशीतील लाभ धारक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला टेल टॅंक(गोविंद सागर) एक पर्यटन स्थळ म्हणून नावा रूपाला यावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी व राजकीय नेत्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून केवळ सामाजिक भूमिका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी या गोविंद सागराची,खोली, रुंदीकरण व त्या भोवती चहूबाजूनी असणारे वृक्षांचे सुशोभीकरण, तसेच ठीक ठिकाणी पर्यटकांसाठी विविध प्रकारचे आकर्षक ट्रॅक असे विविध प्रकारचे प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्यावे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अहिल्या नगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तुमच्या माध्यमातून मी स्वत पाठपुरावा करून हा टाकळीभानचा टेलटॅंक (गोविंद सागर) या तलावाचा जिल्ह्यात नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये कशी ओळख होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले. याप्रसंगी विधिवत जलपूजन करून मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी व श्रीफळ वाढवून जल पूजन करण्यात आले. 
     यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी आ. लहू कानडे व अविनाश दादा आदिक यांचा  सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रम प्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, प्राचार्य जयकर मगर, विष्णुपंत खंडागळे, माजी सभापती नानासाहेब पवार, हंसराज आदिक, एडवोकेट संदीप चोरगे, सचिन पवार, सुनील थोरात, प्रशांत खंडागळे, प्रसन्न शेटे, देवा कोकणे,रेवननाथ कोकणे, प्रा. दिलीप कोकणे, बंडोपंत पटारे, शंकरराव पवार, भास्करराव कोकणे, आबासाहेब रणनवरे,अनिल कोकणे, श्रीकृष्ण वेताळ,संतोष पटारे, ॲड.रत्नाकर रणनवरे,रंगनाथ माने, सुभाष पटारे, सुरेश पवार, सुबोध माने, अक्षय कोकणे, दत्तात्रय लोखंडे, शरद रणनवरे, दिलीप राजे पवार, विलास सपकळ, किशोर गाढे, संदीप पटारे, काकासाहेब डिके, बाळासाहेब खुरुद , मधुकर गायकवाड, आदी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुरोहित्य सुदाम गुरु देवलालकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments