त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय घोगरगाव येथेराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय घोगरगाव विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली,
     राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला नेवासा तालुक्यातील फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव विद्यालयातील वसतीगृह मधील एकूण आठ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 14  वर्षे वयोगटात आदित्य रामनाथ बर्डे द्वितीय क्रमांक तसेच 17 वर्षे वयोगट 45 किलो वजनी गटांमध्ये शुभम गणेश पवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच 60 किलो वजनी गटामध्ये राज ज्ञानोबा गव्हाणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला 55 किलो वजनी गटामध्ये ऋत्विक विजय कापसे याने द्वितीय क्रमांक मिळवला तर 19 वर्षे वयोगटांमध्ये 60 किलो वजनी गटांमध्ये दीपक सोमनाथ बर्डे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला 65 किलो वजनी गटांमध्ये शिवराज बोडरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर 55 किलो वजनी गटांमध्ये समर्थ विलास तुपे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला विजयी खेळाडूंचे विद्यालयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य माननीय  संतोष जावळे सर प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अमोल बहिरट यांनी  मेजर ध्यानचंद यांच्या विषयी  व राष्ट्रीय क्रीडा दिनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित जूनियर विभाग प्रमुख नितीन साळवे, संदीप काळे, टीपीएस विभाग प्रमुख नंदिनी सरोदे, मनीष वेताळ, रेखा दिवे , विकास कौटे, संभाजी गारुळे, संकेत सावंत, वनिता नाणेकर, संदीप कांबळे, रंजीत कुमावत, अश्विनी खुरुद महेश सरोदे, प्रियंका कोरडे पूजा ढोकणे महेक पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अर्चना जगताप यांनी केले,

Post a Comment

0 Comments