महाशिवरात्र व श्रावण महिन्यात येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.अशा श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रांण प्रतिष्ठा तृतीय वर्धापन दिन सोहळा निमित्त सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी शिवलीलामृत ग्रंथ पारायण प्रारंभ होणार आहे व सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी समाप्ती होणार आहे.सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पाच ते सात या कालावधीत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात अभिषेक नंतर पूजन व महाआरती होणार आहे. त्यानंतर सकाळी सात ते दहा या कालावधीत शिवलीलामृत ग्रंथ पारायण सांगता झाल्यानंतर सकाळी दहा ते बारा यादरम्यान सामूहिक शिव भजन होऊन दुपारी बारा ते एक या दरम्यान रोहित थोरे व थोरे परिवारातर्फे खिचडीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात येणार असून दुपारी दोन ते चार या दरम्यान महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे. तरी या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा तृतीय वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवभक्त ,साधक,व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन महंत आत्माराम गिरीजी गुरुभक्त मंडळ व साधकांनी केले आहे.
0 Comments