योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानेज्ञानदान देणाऱ्या गोदावरीचे शनिदेवगांव पावनभुमीत या १७८ व्या सप्ताहाच्या महाकुंभाचा योग जुळवून आला - महंत रामगिरी महाराज

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- गौतम ऋषींनी आणलेल्या या गोदावरीचा गंगेचा उगम ब्रम्हगिरी मधुन होतो.पवित्र अन् ज्ञानदान करणाऱ्या या गोदावरीच्या कुशीत प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेले आहे.अशा या पावन झालेल्या परिसरात जिथं तिथं देव देवतांचे  अस्तित्व असुन इथं आल्यावर महाकुंभाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.अशा या शनिदेवगांव सप्तक्रोशीच्या पावणभुमीत पवित्र गोदातीरी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने १७८ सप्ताहाच्या महाकु़ंभाचा योग जुळवून आला असल्याचा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी शनिदेवगांव येथील १७८ व्या सप्ताहात  दुसरे पुष्प गुंफताना प्रवचनातून उपस्थित लाखो भाविकांना केला.
              श्रीरामपूर- वैजापूर तालुका हद्दीवर गोदातीरावर शनिदेवगांव सप्तक्रोशी येथील योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा गुरूवार दि.३१ जुलै २०२५  दुसरा दिवस. ढगाळ वातावरण निवळुन सुर्यदर्शन होऊन ऊन पडल्याने आमटी भाकरी महाप्रसादाच्या पहील्या दिवशी लाखों भाविकांनी महाप्रसाद व प्रवचनास गर्दी केली होती. महंत रामगिरी महाराज यांनी भगवद् गीतेच्या  ११व्या अध्यायातील , "भक्त्यात्वनन्यया शक्य अहमेवंविधोर्जुन "  या ५४ व्या श्लोकावर  अनन्य व निष्काम भावनेने केलेल्या भक्तीसह, पवित्र ज्ञानदान देणाऱ्या गोदावरीचे  महत्व भाविकासमोर   प्रवचनातून मांडले.    
. या शनिदेवगांव सप्तक्रोशीत गोदातीरावरील विविध देवदेवतांच्या स्थानांचे महत्व सांगताना महाराज पुढे म्हणाले की या  पवित्र गोदातीरावरील  १७८व्या व्या सप्ताह भुमी दंडकारण्य प्रभु रामचंद्रांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली भुमी असुन गावात हेमांडपंथी शिवालय, पुरातन शनैश्वर देवस्थान,जिथं जावं तिथं देवदेवतांचे स्थाने आहेत.पलिकडच्या तिरावर डोमेग्राम येथील श्रीचक्रधर स्वामी चे वास्तव्य असलेले श्रीकृष्ण मंदिर, शीख बांधवांचे गुरूद्वारा  देवस्थान, या भुमीत स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी वास्तव्य केलेले आहे.   गोदावरी पात्रात पूर्वी जलाशय साठ्याच्या   खोल रांजण खळगेच्या पाऊल खुणांचा इतिहास सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी सांगितला असल्याची आठवण यावेळी प्रवचनातून महाराजांनी करून दिली.
     गो म्हणजे ज्ञान दा म्हणजे दान अशा  ज्ञानदान देणाऱ्या गोदावरीचे वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञान गोदावरीचे तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवांचे अंतरीं भगवान दत्तात्रये योगी ,,
‌सर्व ज्ञानात अन्नदान सर्वश्रेष्ठ  असुन अन्नदानात तृप्ती आहे. अन्नदान भोजन करताना  पुरे पुरे म्हणतो दुपारनंतर पुन्हा भुक लागते.  म्हणुन अन्नदानाहुनही ज्ञानदान सर्वश्रेष्ठ होय. अन्नदानाने शरिराची तर ज्ञानदानाने जिवनाची तृप्ती होते."  नच राज हरणम, सर्व धनम प्रधानम, धनामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानरूपी धन आहे.बाकीच्या धनावर सरकारचा इन्कम टॅक्स लागतो.भावाभावाचे हिस्सा वाटणीत भांडणे होतात.मात्र उच्चशिक्षित एखाद्या भावाने एम ए. पदवी धारण करून ज्ञानरूपी धन प्राप्त केलेले असेल तर भाऊ त्यातून  बी ए.पर्यतचा अर्धा हिस्सा मागवू शकत नाही.ज्ञानरूपी धनास  चोरांपासून नाही तर पोरापासुन भीती. दिल्याने झीजही होऊ शकत नाही ऊलट दिल्याने वाढ होते.असे गुरूच्या कृपेने प्राप्त होणारे ज्ञान हे यथार्थ ज्ञान असते.शिष्यांतही गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असावी लागते.समाजात वावरताना खुप गुरू भेटतात.अज्ञानरूपी ज्ञानावर प्रकाश टाकतो तो खरा गुरू होय असे महाराज शेवटी म्हणाले.
        याप्रसंगी सप्ताह कमिटीचे ऊपाध्यक्ष हरिशरणगिरी महाराज,निलगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगेंद्रगिरी महाराज,विष्णुगिरी महाराज,ज्ञानानंदगिरी महाराज, विश्वनाथ गिरी महाराज, चैतन्यगिरी महाराज, रामभाऊ महाराज, राजेश्वर गिरी महाराज,विक्रम महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब (भाऊ)चिडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव मुठे,अशोकचे संचालक  निरज मुरकुटे, जालिंदर मुठे,आदी उपस्थित होते. या सप्ताह कमेटीचे व्यवस्थापक व बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांनी शेवटी उद्याचे कार्यक्रम व  नियोजनाची रूपरेषा सांगितली.

चौकट..
               आजच्या पहिल्या दिवशी पाच
                    टँकर आमटीचा पुरवठा

काल पुरणपोळी मांडे दुध या महाप्रसादाचा दोन लाखांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.आज आमटी भाकरी महाप्रसादाच्या पहील्या दिवशी   एक लाखाहून अधिक भाविकांना दुपारी तीन वाजेपर्यंत चार तर सायंकाळी एक असा एकुण पाच टँकर आमटीचा पुरवठा करण्यात आला असल्याचे स्वयंपाक गृहाचे प्रमुख शिंदे कॅटस येवला यांनी सांगितले.

    सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच मोठ्या
        प्रमाणात तगडा पोलीस बंदोबस्त
  वैजापूर तालुक्यातील विरगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ वरिष्ठ अधिकारी व ३१० महिला पुरुष पोलीस कर्मचारी , गोदावरीचे पार्श्वभूमीवर एस डी आर एफचे २ अधिकारी व ४० जवान असा तगडा पोलीस बंदोबस्तसप्ताहाचे ईतिहासात प्रथमच तैनात करण्यात आला आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याने कमालपूर बंधाऱ्यावर सर्वाधिक बंदोबस्तास एक डिश आर एफचे जवान तैनात होते.

Post a Comment

0 Comments