दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी - महाराष्ट शासनाने आपल्या लोहार समाजसाठी ब्राह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलेले आहे.
त्यानुषगाने सदर आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे, समाज बांधवांनी लाभ घ्यावा अशी आव्हान, दिलीप वसव, व गणेश भालके यांनी केले आहे,
सदर महामंडळाचा लाभ इच्छुक, गरजू आणि गोरगरीब समाज बांधवापर्यंत कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करावा,आपण इथून पुढे महाराष्ट्रातून अशा गरजू लोकांची माहिती गोळा करून प्रत्येक जिल्ह्यातून व तालुक्यातून विविध प्रतिनिधी मार्फत माहिती गोळा करून व यादी करून त्या यादीप्रमाणे त्या कुटुंबाला लाभ कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सदर माहिती वर व यादीवर कोणाचीही कसलीही तक्रार अथवा हरकत असली नाही पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ हा त्या गरजूंपर्यंत पोहोचल्याच समाधान या सर्व समाज बांधवांना होईल
उद्योग व्यवसाय गरजू, लाभार्थी मालक फर्म माहिती. पुढील प्रमाणे,फर्म नावं ,मालक पूर्ण नावं ,पूर्ण पत्ता ,संपर्क नंबर ,उद्योग व्यवसाय स्वरूप माहिती ,अंदाजे वार्षिक उत्त्पन्न,उद्योग व्यवसाय साठी लागणारी कागदपत्रे ,कुटुंब माहिती,
सदरची माहिती फॉर्म दिलीप वसव लोहार, हडपसर, पुणे व गणेश रामदास भालके, राहुरी अहिल्यानगर समाज बांधवांकडे जमा करण्यात यावी. असे आव्हान लोहार समाजाच्या वतीने करण्यात आले,
0 Comments