दिलीप शिंदे
सोयगाव दि.२६ - बोरगाव येथील गणेश पारवे यांना भोकरदन हुन येतांना पिंप्री जवळ रस्त्याच्या कडेला निपचित आडवा पडलेला व तडफडत असलेला पक्षी आढळला होता. तो त्यांनी सिल्लोड येथील वन्यजीव संवर्धक व अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांचे कडे आणला.
सदर पक्षी" रेड वेंटेड बुलबुल" ची मादी असल्याचे व परीक्षणाअंती त्याच्या पंखास मोठी दुखापत झाल्याचे व त्यामुळे तो उडू शकत नसल्याचे जाणवले. त्यावर पाटील यांनी सहा दिवस उपचार केले व उडन्यायोग्य झालेवर त्यास शनिवार रजाळवाडी जवळ नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. डॉ.पाटील यांनी रेड वेंटेड बुलबुल चे प्राण वाचविल्याबद्दल कृषीभूषण अरुण सोहनी, आरोग्यदुत डिगांबर वाघ,सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे,अमोल निकम,पंकज परदेशी,शाम पाटील,महेश मानकर,राजू भवर,रामू सोहनी,दिलीप सुरडकर,हरीश पाटील,अनिल चौधरी,राम फुसे, मुरलीधर बागले,राहुल सोनवणे,हेमराज अस्वार,परशुराम जाधव,शिवाजी गुंजाळ आदींनी अभिनंदन केले.
0 Comments