दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-: येथील जिल्हा परिषद शाळेची पायी दिंडी गावातील प्रति पंढरपूर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेऊन उत्साहात पार पडली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, वारकरी, भजनी, टाळकरी यांच्या सुंदर वेशभूषा केल्या होत्या. यावेळी पायी दिंडी प्रसंगी विठू रुक्माईच्या जय घोषाच्या गजरामध्ये या विद्यार्थ्यांनी गावामध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण केले.
या दिंडीसाठी प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी पटारे, कुमार कानडे, यशवंत गागरे सर, सुनिता जाधव,जया दुधाळे, उज्वला शेळके, ज्योती गावडे, उज्वला पाचरणे आदी शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
0 Comments