दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०३-विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम वातावरण तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळाच गुणकारी ठरतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणा चे बाळकडू द्या असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांनी गुरुवारी तिडका येथे केले.
तिडका, घोसला येथे गुरुवारी चांदमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा प्रतिष्ठानच्या वतीने घोसला, तिडका येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले यावेळी पंकज बारवाल यांनी मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतील मराठी शाळेतील शिक्षण द्या जिल्ह्यात जरंडी ची शाळा अव्वल आहे या शाळेचा आदर्श घ्या असे आवाहन केले यावेळी उपेंद्र कुलकर्णी,(दिन दयाळ शोध संस्थान दिल्ली),मनीष अग्रवाल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे, जिल्हाध्यक्ष विजय काळे,ज्ञानेश्वर युवरे,सरपंच गणेश माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाचशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले दरम्यान तिडका व घोसला येथील शाळेत हे कार्यक्रम झाले सोपान गव्हांडे यांनी प्रास्ताविक केले. तिडका येथील कार्यक्रमात गुलजार तडवी सरपंच तिडका, उत्तम मोरे, सुलतान पठाण,नईम शेख,शंकर जाधव, तिडका शाळेचे मुख्याध्यापक एन आर मोरे,एस आर चौधरी, पी ए जैस्वाल आदि उपस्थित होते घोसला येथे मुख्याध्यापक विजय राजपूत, सुनील महालपुरे आदींची उपस्थिती होती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर युवरे, सरपंच गणेश माळी,गणेश तायडे,भैय्या युवरे,ज्ञानेश्वर गवळी, अमोल बोरसे,गणेश गवळी आदिंनी पुढाकार घेतला आभार जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी मानले..
0 Comments