दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मा ना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गाव तेथे शाखा राष्ट्रवादी कॉग्रेस फलकाचे अनावरण करण्यात आले होते गावातील सर्व अधिकारी पदाधिकारी व सुजान नागरीक या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतू त्याच दिवसी रात्रीचा फायदा घेऊन कोणी एका अज्ञात व्यक्तीकडून त्या फलकाचे मोडतोड व फ्लेक्स ची फाडतोड केली गेली हे दुसऱ्या दिवसी काही नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी त्वरीत काही श्रेष्ट कार्यकर्ते बोलावून घेतले त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
गावातील असा प्रकार कधीच झालेला नाही ज्या कोणी व्यक्तिने हे कृत्य केले आहे त्याला चांगल्या प्रकारची कडक शिक्षा झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष यांच्या कडून व कार्यकर्त्या कडून पोलीस प्रशासनाच विनंती केली लवकरात लवकर त्या अज्ञान इसमास अटक करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
0 Comments