टाकळीभान येथे दहीहंडी उत्सव साजरा
टाकळीभान - प्रतिनिधी - टाकळीभान येथील प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशीनंतर गुरु पौर्णिमेच्या दहीहंडी उत्सव साजरी, महिलांनी व पुरुषांनी घेतला फुगड्यांचा आनंद ,
बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी विठ्ठल मंदिरात दिंड्यांचे आगमन होऊन परिसरातील दिंड्यांना महाप्रसाद देऊन त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. रात्रभर भजनांचा जनजागर करण्यात आला.
गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान भाविक भक्त व भजनी मंडळ यांनी गावाला प्रदर्शना घातली त्यामध्ये भक्तगण त्यामध्ये तरुण मुले, मुली,व ज्येष्ठ पदाधिकारी वयस्कर महिला व पुरुष यांनी फुगडी खेळून कुलदैवत महादेव या ठिकाणी मंदिर गोपाल काला दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी मंदिराचे पुरोहित राजेंद्र देवळालकर व त्यांचे सर्व कुटुंब,अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, पाटबंधारे विभागाचे बाळासाहेब कोकणे, बाबासाहेब नवघने ,एकनाथ लेलकर, गावचे पाटील विशाल पटारे, नानासाहेब लेलकर, भाऊसाहेब कोकणे, लहान भाऊ नाईक, कुदळ आप्पा, राजू नवले, राजू माने,बाबासाहेब ढूस, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, महिला भजनी मंडळ सर्व भक्त मंडळ,टाळ मृदंग वादक सेवेकरी यांनी सर्वांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
0 Comments