दिलीप लोखंडे टाकळीभान
....................................
टाकळीभान:रयत शिक्षण संस्थेच्या ,न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक.आर .एम शिंदे तर प्रमुख वक्त्या म्हणून विदयालयाच्या गुरुकुल विभाग प्रमुख श्रीमती एन . ए . पालवे होत्या .
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष . आर . एम .शिंदे , पर्यवेक्षक .एस .एस . जरे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती सौ . लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक . आर . एम . शिंदे म्हणाले की ,प्राचीन काळापासून आपल्या आई -वडिलांप्रमाणे गुरुंचे आपल्या जीवनात खूप मोठे योगदान असून विद्यार्थ्यांनी गुरुंचे उपकार कधीही विसरू नये . विद्यालयाच्या गुरुकुल विभागप्रमुख श्रीमती एन . ए . पालवे यांनी विविध उदाहरणे व दाखले देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले . यावेळी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचा इयत्ता ९ वीच्या वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला .विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी गुरुपौर्णिमेविषयी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु .सुप्रिया कदम ,सूत्रसंचालन कु . आसिया सय्यद तर आभार श्रीमती ए .जे . गेडाम यांनी व्यक्त केले .
0 Comments