दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सोयगाव येथील युवा शिक्षक प्रणय प्रमोद कुलकर्णी यांना २०२५ चा,भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात प्रणय कुलकर्णी यांना आदर्श युवा शिक्षक या मानद उपाधीसह गौरवण्यात आले.
समाजप्रबोधन, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास, विज्ञानाचे प्रचार-प्रसार तसेच विद्यार्थ्यांचा सर्व विकास व्हावा हे ध्येय घेऊन काम करत आहे तसेच नवोन्मेषी उपक्रमांच्या माध्यमातून ते गेल्या वर्षांपासून कार्यरत आहेत.युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे, ग्रामीण भागातील गुणवंत शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यात कार्याध्यक्ष प्रा. महादेव महानोर , संस्थापक अध्यक्ष अशोक गोरख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.कुलकर्णी यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल समाजसेवक दत्तू रोकडे,अमोल निकम, कृषीभूषण अरुण सोहनी, डीगू वाघ, डॉ.केतन काळे,महेश मानकर,नाना एलिस,योगेश काळे,शाम पाटील,पंकज परदेशी,ईश्वर इंगळे आदींसह शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
0 Comments