दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आज दुपारी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक कार्यकर्ते सह प्रवेश केला.
यावेळी मा.खा.सदाशिव लोखंडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नाना पाटील, नीरज मुरकुटे, सुरेश पा. गलांडे, पुंजाहरी शिंदे, आदिनाथ झुरळे, अॅड. सुभाष चौधरी, दिगंबर शिंदे, सोपानराव राऊत, संजय छल्लारे, बाबासाहेब काळे, हिम्मतराव धुमाळ, भगवान सोनवणे, प्रवीण फरगडे, राजेंद्र देवकर, भगवान उपाध्ये, संकेत संचेती, गणेश छल्लारे, मयूर पटारे, ज्ञानदेव साळुंखे, शिवाजी शिंदे,मनोज दिवे, अमोल कलांगडे, कल्याण लकडे, अमोल ढोकचौळे, गणेश भाकरे, निलेश बोरावके उपस्थित होते.
माजी आ. भानुदास मुरकुटे हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आज भल्या सकाळी आपल्या समर्थकांसह ठाण्याकडे रवाना झाले. ५-५० चारचाकी वाहनांसह मुरकुटे समर्थकांना घेवून ठाण्यामध्ये दाखल झाले. ठाणे येथील एका भव्यदिव्य हॉलमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीरामपूर तालुका आणि शहरातील मुरकुटे यांचे समर्थक उपस्थित होते. दुपारी २ नंतर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला,
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुरकुटे यांनी आता काम करण्याचा निर्णय
घेतलेला आहे. लाडक्या बहिणीसारखी लोकप्रिय योजना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी आणल्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. त्यांची ही योजना चांगली असल्यामुळे आपण राष्ट्रवादीऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुरकुटे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मुरकुटे यांच्याबरोबरच त्यांचे नातू नीरज मुरकुटे हेही आपल्या राजकारणी पहिली इनिंग शिवसेनेपासून सुरू करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे हेही आज उबाठा शिवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला,
0 Comments