श्री स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह. पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्व साधारण उत्साहात संपन्न--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.29- श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आमखेडा यांची दि.28 शनिवारी संस्थेचे अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांच्या अध्यक्षतेखाली 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल अमृत इन याठिकाणी उत्साहात पार पडली. दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संचालक एस.टी.पाटील यांच्याहस्ते पुष्पहार पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.दीपप्रज्वलन संचालक एस.टी.पाटील,डॉ रघुनाथ फुसे, निंबायती सरपंच राजू पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रवींद्र पाटील, इंद्रजित राजपूत(खस),अरुण सोहनी यांचा पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
        सभे दरम्यान पतसंस्थेच्या वाटचालीची माहिती संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील यांनी उपस्थिती सभासदांना दिली. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विष्णु दुसाने,संचालक बाबू पटेल,युवराज आगे,आकाश वरकड,एस टी पाटील,अर्जुन बोडखे,अमोल निकम,सौ.मिरा कोलते,सिंधुबाई इंगळे,मंगलाबाई निकम,तज्ज्ञ संचालक आशियाना कदिर शहा,राहुल गोसावी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सतिश कोलते तर संस्थेचे अध्यक्ष ऍड राजेश गिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी सुनील सैंदाणे,गणेश पवार, दैनिक सुलभ संचय ठेव प्रतिनिधी देविदास बैरागी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments