सोयगाव आगारात दाखल झालेल्या अत्याधुनिक बसेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते लोकार्पण-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.28-  सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन 5 अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. सोयगाव येथील आगारात हा कार्यक्रम पार पडला.

    आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव आगारासाठी पहिल्या टप्यात 10 अत्याधुनिक बस मंजूर झालेल्या असून त्यातील 5 बसेस सोयगाव आगारास प्राप्त झाल्या उर्वरित बसेस लवकरच सोयगाव आगारात दाखल होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलतांना दिली. नवीन अत्याधुनिक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरण पूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे साध्या दरात या बसने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, सोयगाव न.प. शिवसेना गटनेता अक्षय काळे,  आगार प्रमुख मनीष जवळीकर, स्थानक प्रमुख सतीश अंभोरे, यांच्यासह युवासेनेचे कुणाल राजपूत, विक्रम चौधरी, जीवन पाटील, भारत तायडे, मोतीराम पंडीत,सोयगाव आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर, आर. डी.चौधरी,संतोष पाखरे, सूर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments