दिलीप शिंदे
सोयगाव दि.16- झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली बांधलेल्या दोन बैल वीज कोसळून जागीच ठार झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान सोयगाव तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे दुपारी अचानक दोन वाजता विजांचा कडकडाट सुरू झाला होता तालुक्यातील आबा भिका चौधरी(रा गोंदेगाव) यांच्या गट क्र-169 मध्ये अचानक वीज कोसळून त्यांची दोन्ही बैल ठार झाली.
दरम्यान महसूल व पशुसंवर्धन विभागाने सायंकाळी सहा वाजता घटनेचा पंचनामा केला आहे या घटनेत शेतकरी आबा भिका चौधरी यांचे एक लाख पन्नास हजार रु चे नुकसान झाले आहे.
0 Comments