राहाता तालुका प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील ज्या गावांमध्ये बालविवाह होतील त्या गावातील ग्रामसेवकास जबाबदार धरून त्याच्यावर बाल विवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी व त्या ग्रामसेवकास त्वरित बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी राहता गट विकास अधिकारी यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की, राहता तालुक्यामध्ये ज्या गावात विवाह होणार असेल त्या विवाहातील वधू-वरांचे जन्माचे दाखले संबंधित गावातील ग्रामसेवकाने तपासणे आवश्यक आहे. यामध्ये मुलीचे वय आठरा वर्ष पूर्ण व मुलाचे वय एकवीस वर्षे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी करनेआवश्यक आहे. मुला मुलीचे वय तपासूनच गावातील ग्रामसेवकाने विवाहाची परवानगी द्यावी. आणि वय पूर्ण असेल तर संबंधित पोलीस स्टेशनची त्वरित संपर्क करून सदर विवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करावे. व तशी समज मुला मुलींच्या पालकांना द्यावी. कारण बालविवाहाचे अतिशय घातक परिणाम समोर यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. आणि तरीही यापुढे ज्या गावात बालविवाह झाला असे सिद्ध झाल्यास त्या गावातील ग्रामसेवकास जबाबदार धरण्यात यावे व कर्तव्यात कसूर केला म्हणून त्वरित सदर गावातील ग्रामसेवकास त्वरित बडतर्फ करण्यात यावे व या ग्रामसेवकावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे यांनी राहता गट विकास अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली व हा गंभीर विषय निदर्शनात आणून दिला. राहता गट विकास अधिकारी यांनी त्वरित पावले उचलून सर्व ग्रामसेवकांना पत्राद्वारे सुचित करण्यात येईल व या विषयाकडे अतीशय काजीपूर्वक लक्ष्य दिले जाईल असे संघटनेला आश्वासन दिले आहे .
0 Comments