सारनाथ (राजकुमार गडकरी) भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अशा वाराणसीपासून सुमारे १३ किमी अंतरावर सारनाथ हे ऐतिहासिक शहर आहे. श्रीक्षेत्र वाराणसी ला भेट दिल्यानंतर बहुतांशी अनेक जण हे सारनाथला भेट देत असतात.
येथे भगवान गौतम बुद्धांनी प्रथम धर्म शिकवला. येथे बोधिवृक्षाखाली पाच जणांना त्यांनी दीक्षा दिली. ते सर्वात जास्त काळ युनेस्कोच्या यादीत राहिल्यानंतर सारनाथ जागतिक वारसा स्थळ बनले.
येथे वाराणसी वरून रिक्षा ,बसने जाते येते.येथे भगवान गौतम बुद्धांनी प्रथम धर्म शिकवला. ते हे महत्त्वाचे ठिकाण आहे.सारनाथला जगभरातून बौद्ध धर्माचे अनुयायी भेट देतात.जैन धर्माच्या अनुयायांसाठीही हे ठिकाण महत्त्वाचे आहे;जैन धर्माचे अकरावे तीर्थंकर श्रेयसन्नाथ यांचे जन्मस्थान असलेले सिंहपूर गाव जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे. तेथे त्यांचे जन्मस्थळ विकसित करण्यात आले आहे.
सारनाथची सर्व मंदिरे आणि अवशेष पाहण्यासाठी एक दिवस आवश्यक आहे. स्तूप ,व येथे उत्खननात सापडलेली पुरातन संस्कृतीचे अवशेष तसेच म्युझियम साठी 30 रुपये प्रवेश फी आहे.धमेका स्तूप इ.स. ५०० मध्ये बांधलेला आहे. तसेच येथे उल्लेख आहे .जिथे बुद्धांनी बोधिसत्व प्राप्त केल्यानंतर प्रथम धर्म शिकवला.ही विटा आणि दगडांनी बनलेली एक उंच दंडगोलाकार इमारत आहे.स्तूपावरील दगडी कोरीव काम, शिलालेख आणि शिल्पे त्या काळातील कारागिरांची क्षमता दर्शवतात.
इथल्या चौखंडी स्तूप आहे .जिथे भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना पहिल्यांदा भेटले होते तेच हे नेमके ठिकाण आहे. नंतर मुघल शासक हुमायूनच्या भेटीचे स्वागत करण्यासाठी अष्टकोनी इमारत देण्यात आली होती. सारनाथ पुरातत्व संग्रहालय प्रसिद्ध आहे. हे सर्वात जुन्या साइट्सपैकी एक आहे. संग्रहालयात अशोकाच्या सिंहाच्या राजधानीचा प्रसिद्ध पुतळा आहे. अशोक स्तंभ त्यालाच म्हणतात.जे आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह देखील म्हणून ओळखले जाते. भारतीय चलनावर येथील अशोक स्तंभाचे चित्र आहे. येथे संग्रहालय असून या संग्रहालयात या पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत. बलुवा दगडा पासून बनवलेल्या या कलात्मक प्रतिकृती येथे आहेत.तिसर्या ते बाराव्या शतकातील कलाकृती, हस्तलिखिते या सर्व बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. सारनाथ मंदिर आहे.सारनाथला झाडी बगीचा असल्यामुळे येथे सुंदरता आहे व स्वच्छता ही आहे.
शुक्रवारी सारनाथचे स्थानिक संग्रहालय बंद असते. इतर दिवशी सुरू असते.
काही स्मारकांची तिकिटे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा प्रवेशद्वारावरील तिकीट बूथवरून ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकतात. तीस रुपये तिकीट आहे.
धमेक स्तूप कॉम्प्लेक्स हे ठिकाण आहे जिथे बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता.सारनाथचे हे मुख्य आकर्षण आहे.अशोक स्तंभही याच ठिकाणी आहे.
स्मारकात जाण्यासाठी तिकीट आवश्यक आहे.धमाख स्तूपाच्या उद्यानात दररोज संध्याकाळी एक नेत्रदीपक साऊंड अँन्ड लाईट शो आयोजित केला जातो.बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बुद्धाच्या जीवनाची आणि शिकवणीची कथा सांगितली आहे.
थाई मंदिर आणि मठ, चौखंडी स्तूप, अध्यात्मिक ज्ञानाची बाग आणि मूलगंधा कुटी विहार ही सारनाथमधील इतर प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. हे सर्व पाहण्यासारखी व ऐतिहासिक स्थळे आहेत. वाराणसी झाल्यानंतर येथे सारनाथला प्रत्येकाला अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटक भाविक भेट देत असतात. त्यामुळे हे एक पर्यटन वैयक्तिक शहर झाले आहे. वाराणसी , पांडेयपुर आशापुर आणि सारनाथ हे शहरे जणू जुळी शहरे बनली की काय असे वाटते. या ऐतिहासिक सारनाथ शहराला प्रत्येक भारतीयाने विशेष तरुणांनी एकदा तरी भेट द्यावी व इतिहासाची माहिती घ्यावी. असे वाटते.येथील ऐतिहासिक भव्य स्तूप, संग्रहालय, पुरातन शिलालेख, व प्रसिद्ध असे गौतमबौद्धाचे मंदिर प्रसिद्ध! एकदा तरी भेट देण्याची गरज.
0 Comments