लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयास कर्मवीर पारितोषिक पुरस्कार 

लोहगाव (वार्ताहर) नगर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयास चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव गौरवार्थ रयत शिक्षण संस्थेचे सर्वोच्च कर्मवीर पारितोषिक जाहीर झाले आहे.
 हे पारितोषिक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्ताने शुक्रवार दि. ९ मे २०२५ रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त विद्यालयाचे फेर मूल्यांकन करून दिले जाणारे पारितोषिक असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. विद्यार्थी उपस्थिती, कर्मवीर स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा, शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षा, शालेय निकाल, शालेय चित्रकला परीक्षा, विद्यार्थी प्रगती, विद्यार्थी आरोग्य व स्वच्छता, शालेय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, शाला बाह्य विविध उपक्रमात शाळेचा सहभाग, शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमातील व स्पर्धांमधील सहभाग व कार्यवाही, विद्यार्थी सुरक्षितता, स्पोकन इंग्लिश प्रकल्प, अध्ययन व अध्यापनात संसाधनाचा उपयोग, शिक्षण व्यावसायिक कौशल्य, शालेय भौतिक सुविधा, खेळ, स्वच्छतागृह, पाणी, विद्यालय स्वच्छता, आर्थिक बाबी, हिशोबातील नियमितता, शाखेसाठी पालक व सेवकांची आर्थिक मदत, विद्यालयाची प्रसिद्धी, विद्यालयातील उल्लेखनीय बाबी आदी निकषांची पूर्तता व त्याबाबत पुरावांची तपासणी करून या पारितोषिकासाठीचे मूल्यांकन केले गेले आहे. 
विद्यालयास मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे, ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, माजी ऑडिटर विश्वासराव काळे, शाळा समिती सदस्य अंबादास गारुडकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींनी अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार मिळविण्यासाठी मुख्याध्यापिका छायाताई काकडे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

0 Comments