टाकळीभान :- प्रतिनिधी - टाकळीभान येथील संत सावता महाराज मंदिरात कृष्णा महाराज वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली व टाकळीभान ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने (दि. २४) एप्रिल ते ४ मे, या कालावधीमध्ये बालसंस्कार व वारकरी प्रशिक्षण शिबिर सुरू असून. या बाल शिबिराला 60 बाल गोपाळांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .
देशाचे आणि राष्ट्राचे भविष्य असलेली येणारी पिढी संस्कारक्षम असायला हवी, परंतु हिच पिढी विज्ञान युगात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यसनाधीन व कुर होत चाललेली पाहायला मिळते. या व्यसनांना आणि वैचारिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक धार्मिक संस्काराची गरज आहे.
त्यामुळे महंत भास्करगिरी महाराज व गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या आशिर्वादाने हे बालसंस्कार व वारकरी प्रशिक्षण शिबिर सुरु असून . या शिबिरात योगासने, भगवत गीता, पखवाज वादन, वारकरी भजन, हरिपाठ, पाऊल्या, नित्य नियमाचे श्लोक शिकवले जात आहे. गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेल्या शिबिरामधील बाल गोपाळांना भाविक भक्तांकडून स्वयंस्पृतिने अन्नदान सुरू आहे. सुरू असलेल्या बाल संस्कार शिबिरास देवगडचे महंत प्रकाशनंदगिरीजी महाराज यांनी नुकतीच धावती भेट देऊन बाल गोपाळांचे कौतुक केले,तर ह भ प डॉ, सोनाली भालेराव यांनी विद्यार्थ्यांना सार्थ श्रीरामरक्षा पुस्तिका देऊन मार्गदर्शन केले, तसेच विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही या शिबिरास भेटी देऊन शिबिरातील मुलांचे कौतुक केले,
शनिवारी 3 ता, सायंकाळी चार वाजता पालखी भव्य मिरवणूक निघणार आहे,व रविवारी चार ता, सकाळी दहा ते बारा ह भ प कृष्णा महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे,
0 Comments