दिलीप शिंदे
सोयगाव दि.21- साईवनशा संगणक प्रशिक्षण केंद्र व आरंभ कोचिंग क्लासेस सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव तालुक्यातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दि.22 गुरुवारी सकाळी 09:00 वाजता कुरुक्षेत्र अकॅडमी सोयगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
सोयगाव वकील संघाचे तालुकाध्यक्ष तथा श्री स्वामी समर्थ पत संस्थेचे चेअरमन ऍड राजेश गिरी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एस.म्हस्के, पॉलिटेक्निक कॉलेज कन्नड प्राचार्य संतोष मतसागर,बार्टी समाज कल्याण समन्वयक रवींद्र बारी, ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करियर मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन साईवनशा कॉम्प्युटर चे संचालक बिराजी गायकवाड,राजेंद्र जावरे व आरंभ कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा.योगेश सुनील काळे व प्रा.प्रणय पी.कुलकर्णी यांनी केले आहे.
0 Comments