सावळीविहीर येथे अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी..अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यास जगी तोड नाही..ओमेश जपे.

शिर्डी... राजेंद्र दुनबळे
सावळीविहीर येथे सामाजिक काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून अहिल्याबाई होळकर जयंती साजरी..
राजकारणी असूनही राज योगिनी झाली पुण्य कर्म करूंनी पुण्यश्लोक झाली.. अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सावळीविहिर बू. येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सावळीवीहीर बू.ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे महिलांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले .महाराष्ट्र शासन यांच्या बालविकास प्रकल्प माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कामे करणाऱ्या . माजी सभापती.
बेबीताई जिजाबाआगलावे. सामाजिक महिला कार्यकर्त्यामेघा जोशी .मनीषा संतोष जपे .जयश्री विनायक आगलावे.बेबी मच्छिंद्र सोनवणे.या
महिलांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 
या प्रसंगी सावळीविहीर गावाचे लोकनियूक्त सरपंच
ओमेश जपे म्हणाले की अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती असल्याने त्यांनी केलेल्या कामाची व कार्याची समाजाने कायमस्वरूपी दखल घेणे गरजेचे आहे समाजात राहून सामाजिक आरोग्य. शैक्षणिक. क्रीडा. धार्मिक. या कामाची दखल घेऊन सावळीविहिर येथील पाच महिलांचा यावेळी यथोचित सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला. जेणेकरून समाजामध्ये याचा चांगला परिणाम होईल व अनेकांच्या हस्ते सामाजिक काम घडेल. 
याप्रसंगी उपसरपंच विकास जपे. ग्राम विस्तार अधिकारी कार्ले . जिजाबा आगलावे. शांताराम जपे.गणेश आगलावे. पत्रकार राजेंद्र दुनबळे. राजेंद्र आगलावे. आशिष आगलावे. पो.पा.वाघमारे.किरण आगलावे.गणेश बनसोडे. ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच ओमेश जपे यांनी महिलांचा सत्कार केल्यामुळे ओमेश जपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments