असे साई संस्थान कडून कळविण्यात आले आहे. सध्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .त्यामुळे देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र मोठी दक्षता घेण्यात येत आहे. तसेच श्री साईबाबांचे मंदिर स्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा मेल श्री साईबाबा संस्थानला दिनांक 2 मे 2019 रोजी प्राप्त झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हार फुले गुच्छ प्रसाद शाल इत्यादी नेण्यास अकरा मे 2025 पासून पुढील आदेश होईपर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे. तरी सर्व साई भक्तांनी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून साई मंदिरात दर्शनासाठी जाताना हार फुले गुच्छ प्रसाद शाल घेऊन जाऊ नये. साई भक्तांनी सहकार्य करावे. असे आवाहन साई संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments