टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान व परिसराला वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटॅकच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती देवदास कोकणे यांनी दिली.
स्व. गोविंदराव आदिक हे कृषीमंत्री असताना १९७२ साली टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकची निर्मिती केली, मात्र ५० वर्षात या टँकच्या दुरूस्तीसाठी कोणतेही भरीव काम झालेले नाही. टेिलटँकचे बांधकाम तसेच लोखंडी पूल मोडकळीस आलेला होता. त्यामुळे या दुरूस्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
या परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी अविनाश आदिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे टाकळीभान टेलटँकच्या दुरूस्तीसाठी, बांधकामासाठी तसेच नवीन लोखंडी पूलाचे कामासाठी आर्थिक निधी मंजूरी मिळवून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेवून आदिक यांनी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे. टेलटँकचे शेवटचे रोटेशन संपल्यावर गेटचे नवीन बांधकाम, नवीन लोखंडी पूलाचे काम तसेच टेलटँकच्या भिंतीवर वाढलेली झाडी झुडपे काढण्याच्या कामास सुरूवात होवून ही कामे नियोजित वेळेत पुर्ण केले जाणार आहे. या सर्व कामांसाठी लागणारी आर्थिक तरतूद अविनाश आदिक यांनी पाटबंधारे खात्याकडून करवून घेतलेली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ही मागणी पुर्ण झाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी अविनाश आदिक यांचे मनापासून कौतूक करून त्यांना धन्यवाद दिले.
0 Comments