राहाता तालुक्यात सावळीविहीर खुर्द हे विकासाचे बनले केंद्र! एमआयडीसी, पशु वैद्यकीय महाविद्यालय तसेच विस्थापितांना मिळणार घरे! निमगावला लवकरच होणार क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन--डॉ.सुजय विखे पा.

शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द हे विकासाचे केंद्र बनले असून येथे एमआयडीसी, पशुवैद्यकीय महाविद्यालय , तसेच विस्थापितांना जागा ,असे अनेक विकास कामे होत आहेत.याबरोबरच येथील गट नंबर 144 मधील विस्थापितांना सहा महिन्याच्या आत घरे बांधून देण्या बरोबरच रस्ते पाणी लाईट गटारी सोयीसुविधाही देण्याचे आश्वासन मा. खा. युवा नेते डॉ.सुजयदादा विखे पा. यांनी दिले आहे.

 राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे सुमारे 120 विस्थापित झालेल्या नंद्यावाल्या वसाहती मधील प्रत्येक कुटुंबांला गट नंबर 144 मध्ये पाचशे स्क्वेअर फुट जागा विनामूल्य देण्यात आली असून या संदर्भात लाभार्थ्यांना पत्र व ग्रामपंचायतचे उतारे डॉ. सुजय  विखे पा. यांच्या हस्ते देण्यात आले.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णा नरहरी पा. जमधडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच अशोकराव जमधडे, महेश जमधडे ,सावळविहीर खुर्द च्या सरपंच सौ. अर्चनाताई  शिरसागर, सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच ओमेश जपे, मा. सरपंच बाळासाहेब जनार्दन जपे, रूईचे सरपंच संदीप वाबळे,मा. सभापती जिजाबा आगलावे, मार्केट कमिटीचे चेअरमन ज्ञानेश्वर आबा गोंदकर , संचालक शांताराम जपे, पप्पू क्षीरसागर,गागरे साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजय दादा विखे पा. म्हणाले की, शिर्डी मतदार संघातील सावळीविहीर खुर्द येथे शेती महामंडळाच्या गट नंबर 144 मधील नंदीवाली वसाहत येथील विस्थापितांना करोडो रुपयाची असणारी जागा घरकुलांसाठी विनामूल्य देण्यात येत आहे. जागेबरोबरच तीन महिन्यात येथे रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट ,पाण्याची व्यवस्था याचबरोबर सहा महिन्यात घरे बांधून देण्याची जबाबदारी आपली आहे. आत्तापर्यंत आपण दिलेली आश्वासने  पूर्ण केली आहेत व हेही आश्वासन आपण पूर्ण करणारच !असे सांगत शिर्डी मतदारसंघात एमआयडीसी ,पशु वैद्यकीय महाविद्यालय तसेच शिर्डीचा विकास सध्या सुरू आहे. शिर्डी,रुई , सावळीविहीर खुर्द येथेही विस्थापितांना घरे दिले जातील. लवकरच शिर्डी जवळील निमगाव येथे भव्य क्रिकेट स्टेडियम होणार असून त्याचे उद्घाटन लवकरच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ना. विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे चे काम झाले. चाळीस वर्षात ज्यांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी पोहोचले. गोदावरीच्या कालव्यांचे काम झाल्याने सातशे क्युसेस पाणी त्यातून वाहणार आहे. या कालव्यांच्या चार्‍यांची  खोली वाढवण्यात येणार असून मतदारसंघात पाण्याची टंचाई भासणार नाही. तालुक्यात सध्या उन्हाळ्यात एकही पाण्याचा टँकर सुरू नाही. हा विकासाचा स्त्रोत कायम सुरू राहणार असून येथून पुढील चार वर्षे ही विकास कामे होत राहणार आहेत. त्यामुळे आपोआपच निवडणुकीच्या ऐनवेळी येणाऱ्या  लोकांना मतदाराच व गावकरीच आता गाव बंदी करतील असे सांगण्याची गरज नाही. असे सांगत आत्तापर्यंत इतरांनी निवडणुकीच्या वेळी येथे येऊन अनेक प्रयोग केले. मात्र मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना घरी बसवलं आहे. येथे ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाचे पर्व मतदारसंघात सातत्याने सुरू आहे.एक दिवस तुमचा असतो मात्र 365 दिवस त्यानंतर आम्ही विकास कामे करत असतो.  येथे विकास कामे करताना अनेकदा काही कठोर निर्णयही घ्यावे लागतात. मला गोड बोलता येत नाही .गोड बोलणाऱ्यांना जनतेने घरी बसवले आहे. असे नाव न घेता  थोरातांवर त्यांनी टीका करत  पुढे बोलताना ते म्हणाले की,शिर्डी मतदारसंघ हा गुन्हेगारी मुक्त असा करणार असून त्यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतात. स्थानिक प्रतिनिधींनी ही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देऊ नये. ग्रामपंचायतीने कोणतेही दाखले देताना विचारपूर्वक द्यावेत. बाहेरच्या लोकांनी येथे यावे, व्यवसाय करावा ,मात्र डोक्यावर बसू नये. येथील महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत .कायदा सुव्यवस्था अबाधित राहिले पाहिजे. यासाठी स्थानिक प्रतिनिधींनीही लक्ष दिले पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी सरपंच अशोकराव जमधडे बोलताना म्हणाले की , येथील नंदीवाले वसाहती मधील रहिवाशांना ना.राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी जागा व घरे देण्याचे जे आश्वासन दिले होते ते आज पूर्ण होत आहेत.  शेजारच्या तालुक्यातील नेते महसूल मंत्री असताना येथील रहिवाशांना अनंत अडचणी आल्या. न्यायालयातही आम्ही हरलो होतो. मात्र ना. विखे पाटील यांनी हा जागेचा दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. याचा मोठा आनंद आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. सावळीविहीर खुर्द च्या सरपंच सौ. अर्चनाताई क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,येथील शेती महामंडळाच्या जागेत अनेक वर्ष असणाऱ्या अतिक्रमित कुटुंबांनी ना. राधाकृष्ण विखे पा. व डॉ. सुजय दादा विखे पा.यांच्या शब्दाला मान देत व विश्वास ठेवत काही न बोलता त्वरित आपली अतिक्रमित घरे काढली.  व ही जागा मोकळी केली. असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जमधडे यांनी केले, यावेळी येथील विस्थापित नंदिवली वसाहतीच्या कुटुंबांकडून डॉ. सुजय विखे पा यांचा मोठा गुलाब पुष्पहार घालून सत्कार करण्यात ग्रामपंचायत तसेच विविध संघटना,स्थानिक नेत्यांकडूनही डॉक्टर सुजय विखे पा.यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या कार्यक्रमाला पोलीस पाटील राजेंद्र जमधडे, सुरेश वाघमारे,मा. सरपंच सुधाकर चव्हाण ,जांभुळकर, पप्पू क्षीरसागर,सुधीर वर्पे, भीमा वर्पे, भारत जमधडे ,प्रभाकर बोरावके, रवी पंडित, बाजीराव माळी, कैलास पुरे, विजय जमधडे फुले,हाटकर,राजू कुदळे,सावळीविहीर  खुर्द येथील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ,सोसायटीचे पदाधिकारी, सावळीविहीर बुद्रुकचे गणेश आगलावे, गणेश कापसे, कैलास सदाफळ, दत्तात्रेय आगलावे ,आशिष आगलावे , राजेंद्र आगलावे,सागर आरणे, सुरासे, सुधाकर जाधव,सतीश जपे,आदींसह रुई सावळी विहीर खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व पदाधिकारी, रुई, निमगाव तसेच परिसरातील कार्यकर्ते, नागरिक ,त्याचप्रमाणे नंदीवाली वसाहतीतील सर्व लाभार्थी कुटुंबाचे सदस्य, महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments