प्रसिद्ध गायिका आशा भोसले त्याचप्रमाणे राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना . आशिष शेलार यांनी शिर्डीत घेतले साईबाबांचे दर्शन!

राजकुमार गडकरी 

शिर्डी (प्रतिनिधी) प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी मंगळवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष नामदार आशिष शेलार यांनीही शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीवर शाल अर्पण केली
 .साई दर्शनानंतर नामदार आशिष शेलार त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा साई संस्थांनच्या वतीने संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. आशा भोसले एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका आहेत. त्या लता मंगेशकर यांच्या धाकटी बहिणी आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्या आपल्या आवाजातील विविधता आणि विविध शैलींमध्ये गाण्याची क्षमता यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे त्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. त्या शिर्डीत मंदिर परिसरात येताच चहात्यांनीही त्यांना पाहताच हात घालून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments