दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.29-- घोरपड ही कायद्याने शेड्युल 2 चा संरक्षित वन्यजीव आहे. घोरपडीची तिच्या विविध अवयवा साठी विशेषतः तिचे जननेंद्रीयाची हात जोडी म्हणून बेकायदेशीर मोठया रकमेच्या अमिषासाठी विक्री होते. ही हातजोडी भानामती व गुप्त धनासाठी मांत्रिक लोक विकत घेतात.
सिल्लोड शहराजवळ छत्तीस एकर मध्ये बाहेर च्या जिल्ह्यातील वैदू, जडीबुटी विकणारे लोकांचे दुकान लागले होते.हेच वैदू लोक हात जोडी विकत असतात. वन्यजीव संवर्धक व "यशवंती वाचली पाहिजे " हा घोरपड संवर्धनाचा राज्यभर उपक्रम राबविणणारे डॉ. संतोष पाटील यांनी ग्रामीण वेषभूषा करून सहज दुकानात जाऊन,काही वन्यजीव अवयव आहेत का याची खातर जमा केली. हातजोडी मिळेल का अशी विचारणा केले वर, हो उद्या मिळेल असे वैदूने सांगितलं व पाच हजार शंभर रुपयात व्यवहार ठरला. शंभर रु आगाऊ देवून शुक्रवारी 11 वाजता हातजोडी मिळणार असे ठरले. गुरुवारीच वनविभागास कळवून सापळा रचला व ठरल्या वेळेत तंबूत जाऊन पाटील यांनी हातजोडी मागतांना प्यारेसिंग तितोडिया, मूळ - कोटा, राजस्थान, हल्ली राहणार - जळगाव याचे कडून घोरपडी चे जननेंद्रीय जप्त करण्यात आले. सदर हातजोडी हि जळगाव येथून एका जडिबुटी विक्रेता कडून आणलेचे त्याने सांगितलं. वन विभागाच्या उपमुख्य वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रेखा बरबडे, वनरक्षक साई नाथ पवार,मनोज कांबळे यांनी ही कार्यवाही करून पुढील तपास सुरु आहे.
सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments