दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.29- सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवी ते दहावी उत्तीर्ण होईपर्यंत शिक्षण घेतलेल्या नितीन बोडखे रा.वालसावंगी ता.भोकरदन यांनी यूपीएससी परीक्षेत 677 रँक ने यश संपादन केल्याबद्दल.
क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था व अंजनाई गो शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे,सचिव दिलीप शिंदे व संचालक ज्ञानेश्वर गाडेकर यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यात वेगळा आनंद असतो. परिस्थितीची जाणीव व आईने केलेली कष्टाची पराकाष्ठा नियमित डोळ्यासमोर येत असल्याने अभ्यास करताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आईने दिलेल्या प्रेरणेतून मी हे यश संपादन करू शकलो असे नितीन बोडखे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव दिलीप शिंदे,सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर,अनिल लोखंडे,सरपंच गजानन ढगे, वैभव आगे,वैभव अस्वार,नितीन ढगे,राजेंद्र ढगे,ओम पायघन, अशोक ढगे आदींची उपस्थिती होती.
0 Comments