अक्षय तृतीयाला करा केळीचे पूजन होत असल्यामुळे मातीच्या करा केळी बाजारात विक्रीला!


लोहगाव ( वार्ताहर)

अक्षय तृतीयेच्या दिवशी 'करा' आणि 'केळी' पूजन करण्याची विशेष परंपरा आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील व परिसरात सध्या मातीची करा केळी  विक्रीसाठी आली असल्याचे दिसून येत आहे. करा केळी हे मातीचे बनवले जातात. कुंभार कारागीर महिना दीड महिन्यापासून ते बनवण्याचे काम आपल्या फिरत्या चाकावर करीत असतो .करा छोटा असतो केळी मोठी असते. सध्या बाजारात शंभर रुपयाला करा केळी मिळत आहे. काही ठिकाणी त्याच्या किंमती कमी जास्त आहेत. करा केळी ची पूजन करून पितरांना नैवेद्य दिला जातो. . 
'करा' आणि 'केळी' पूजनाने पितृ देवाला प्रसन्न केले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. 
या पूजनाने पितृ दोषाचा त्रास कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते. 
'करा' आणि 'केळी' पूजनाने शुभ फळे मिळतात आणि कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते. अशी नागरिकांचे श्रद्धा आहे. प्रत्येक घराघरात अक्षय तृती याला करा केळी पूजन केले जाते. त्यासाठी आता करा केळी बाजारात विक्रीस झाल्याचे दिसून येत आहे.व ते खरेदी करताना नागरिक विशेषता महिला सध्या बाजारात दिसून येत आहेत.

Post a Comment

0 Comments