दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.30- सोयगाव तालुक्यातील वडगाव तिगजी येथील भिल आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीचे मोजमाफ करून ग्रामपंचायत ने वॉल कंपाउंड घालून द्यावे या मागणीसाठी प्रजा जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद तिगोटे हे बहुसंख्य कार्यकर्त्यांसह दि.01 मे रोजी सकाळी नऊ वाजता तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दि.29 मंगळवारी तहसिल कार्यालयात तहसीलदार,नायब तहसीलदार हजर नसल्याने कर्मचारी ठाले यांनी निवेदन स्वीकारले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, वडगाव तिगजी येथील सर्व्हे न 72 मधील भिल समाजाची स्मशानभूमीची जागा मोजणी करून सदरच्या जमिनीला वॉल कंपाउंड करून देण्यासाठी ग्रामपंचायत वडगाव तिगजी चे सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार तोंडी व लेखी तक्रारी दिल्या असून याबाबत गटविकास अधिकारी दादाराव आहेर यांना ही पत्र दिले परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान दि.06 ऑक्टोबर 2023 रोजी अनेक पत्र ग्रामपंचायत वडगाव तिगजी यांना दिले आहे. 24 महिन्यांपासून भिल आदिवासी समाजाला जाणून बुजून त्रास देण्याचे काम ग्रामपंचायत वडगाव तिगजी करीत असून ग्रामपंचायत चे ग्रामसेवक हे स्मशानभूमीच्या जागेला कंपाउंड घालून देण्यास टाळाटाळ करीत आहे. 7/12 वर आदिवासी भिल समाजाची मालकी असलेली जागा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे कारवाईचे आदेश असताना कारवाई करीत नसल्याने ग्राम सेवक वडगाव तिगजी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार (अट्रोसिटी) गुन्हा दाखल करणे व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी दि.01 मे रोजी तहसिल कार्यालयासमोर सकाळी 9,00 वाजता प्रजा जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद तिगोटे व बहुसंख्य कार्यकर्ते उपोषण करणार असल्याचे सोयगाव तहसिल कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शरद तिगोटे यांची स्वाक्षरी आहे. तहसिल कार्यालयाचे कर्मचारी ठाले यांनी निवेदन स्वीकारले.
प्रतिक्रिया -1) तहसिल कार्यालयात उपोषणाचे निवेदन देण्यासाठी गेलो असता तहसीलदार, नायब तहसीलदार हजर नव्हते.निवेदनावर स्वाक्षरी घेण्यासाठी एक तास भटकंती करावी लागली. तहसिल कार्यालय हे शासनाच्या नियमानुसार नाही तर तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या मनमानी नुसार चालत आहे.
शरद तिगोटे
संस्थापक अध्यक्ष प्रजा जनसुराज्य पक्ष
----------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया-2) तहसीलदार मॅडम यांच्याशी पत्रव्यवहार केला असुन तहसील कार्यालयाकडून काय कारवाई करण्यात आली त्याबाबत अद्यापही लेखी कळविले नाही. सदरील जमीन ही गावठाण नसुन ती जमीन सातबारावर सरकारी दाखवली आहे त्यामुळे तहसीलदार यांनी लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत वॉल कंपाउंड करून दिल्या जाईल.
सुशील मोरे, ग्रामसेवक
ग्रामपंचायत वडगाव तिगजी
0 Comments