शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये राम नवमीला रविवारी साई संस्थांनच्या वतीने श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री रामनवमी उत्सवा निमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला.

त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर श्रींची माध्यान्ह आरती संपन्न झाली. तत्पूर्वी श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळी साईसमाधी मंदिरात संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.तसेच श्री रामनवमी निमित्त रविवारी सकाळी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व प्र. अधिक्षक सामान्य प्रशासन रामदास कोकणे यांनी फोटो घेवून सहभाग घेतला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच वरील मान्यवरांच्या हस्ते सालाबाद प्रमाणे रामनवमीला द्वारकामाईतील बदलण्यात येणा-या गव्हाच्या पोत्याची श्री साईबाबा समाधी मंदिरात विधीवत पुजन करुन गव्हाचे पोते बदलण्यात आले. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व मंदिर पुजारी आदी उपस्थित होते. -त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमीला साई संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीम. अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लेंडी बागेत श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, मंदिर पुजारी व साईभक्त उपस्थित होते. रविवारी श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी झालेली साईभक्तांची अलोट गर्दी शिर्डीत झाली आहे. सर्वत्र साई नामाचा जयजयकार ऐकू येत आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments