महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रामनवमीच्या दिवशी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री मा.खासदार नारायण राणे यांनी श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. 

साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी शाल साई मूर्ती देऊन सत्‍कार केला . यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.   नारायण  राणे हे कोकणातील आहेत . ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते . त्यांनी पूर्वी दुसऱ्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार; महसूल; आणि उद्योग यासारख्या कॅबिनेट मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळलेली आहे . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नारायण राणे तसेच त्यांचे चिरंजीव हे निस्सिम साईभक्त असून नेहमी साई दर्शनासाठी शिर्डीत येत असतात.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments