श्री नर्मदेश्वर सेवाधामच्या वतीने पवित्र उत्तर वहिनी नर्मदा परिक्रमेसाठी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांचे उत्साहात प्रस्थान!

शिर्डी ( प्रतिनिधी) चैत्र महिन्यामध्ये उत्तर वाहिनी पवित्र नर्मदा परिक्रमा करणे, अध्यात्मिक दृष्टीने पुण्यप्रद असून या उत्तर वाहिनी पवित्र नर्मदा परिक्रमेसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री नर्मदेश्वर सेवा धामचे मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपाद शिवकुटी श्री नर्मदेश्वर सेवा धाम येथून मंगळवार 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी पाच वाजता प्रस्थान झाले. त्यानंतर सावळीविहिर येथे मंहत आत्मारामगिरीजी महाराज व परिक्रमाला जाणाऱ्या साधकांचे स्वागत करण्यात आले.  


   सावळीविहीर येथे श्री हनुमान मंदिरासमोर परिक्रमाला जाणाऱ्या महंत आत्माराम गिरीजी महाराज, ह भ प मनोज महाराज बिडवे उर्फ किसनगिरी महाराज, सौ. ललिनीताई बिडवे , ह भ प सुनील कदम, किशोर अहिरे, सोहम अहिरे, रामनाथ वैद्य, अनिता अहिरे, अलका वैद्य,आदी सर्वांना या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी हर हर महादेव! नर्मदे हर! हर हर गंगे! जय जयकार करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले की,भारतात नर्मदा नदी ही सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या   नद्यांपैकी एक नदी आहे. ही एकमेव नदी आहे, जिची भारतात मनोभावे परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रमेचा इतिहास मोठा आहे. संपूर्ण नर्मदा नदीची परिक्रमा ही मार्कंडेय ऋषींनी केली होती. त्यांच्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदा मातेची नव्हे तर तिला येऊन मिळणाऱ्या नद्या उपनद्या ओहोळ ओढे यांना सुद्धा न ओलांडता त्यांच्या उगमापर्यंत जाऊन आणि उगमाला वळसा घालून अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ही परिक्रमा पूर्ण केली होती. ही परिक्रमा पूर्ण करण्यास त्यांना सुमारे 33 वर्षे लागली. फक्त नर्मदा नदीची पायी परिक्रमा करायचे म्हटले तरी हे अंतर सुमारे 3000 किलोमीटर आहे. ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हा एक उत्तम पर्याय आहे. गुजरात राज्यातील गरुडेश्वर या तीर्थस्थानाजवळ रामपुरा ते तिलकवाडा  यादरम्यान नर्मदा नदी ही उत्तर दिशेने वाहते. कोणतीही नदी उत्तर दिशेने वाहने हे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते. गंगा नदी ही काशी जवळ वरुण घाट ते अस्सी घाट दरम्यान उत्तर वाहिनी आहे .त्यामुळे काशी हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. नर्मदा पुराणामध्ये बळीराजाची एक कथा आहे त्यानुसार जर चैत्र महिन्यामध्ये उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य लागते याची खुद्द नर्मदा मैयानेच खात्री दिली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सावळीविहिर येथून मोठ्या उत्साहात सर्वांनी पवित्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी मंगळवार आठ एप्रिल 2025 रोजी सकाळी प्रस्थान केले. नीलकंठ धाम पोईचा येथे मुक्काम करून नऊ एप्रिल 2025 रोजी कुबेर भंडारी व स्टॅच्यू ऑफ युनिटी वरून तिलक वाडा येथे मुक्काम राहणार आहे व 10 एप्रिल 2025 गुरुवार रोजी सकाळी ठीक पाच वाजता तिलक वाडा येथून पायी परिक्रमा करण्यास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. असे यावेळी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी पत्रकार राजकुमार गडकरी, सौ.फाजगे‌ताई, गोकुळ जपे, सौ सुनीता जपे, दयानंद बोर्डे, आदी उपस्थित होते.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)

Post a Comment

0 Comments