नंदकुमार बगाडे
उत्तम बिरादार ,विशाल देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय "छावा' संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या 'छावा" संघटनेच धरणे आंदोलन संपन्न .
या आंदोलनात छावा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक राजेश चव्हाण सर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील भीम आर्मी, मानवाधिकार संघटनेचे दलित समाजाचे नेते नितीनजी एकुर्गेकर ,एमपी जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय वशीहश्मी सर ,धनराज बिरादार ,
शहराध्यक्ष विजय पाटील, बालाजी भोसले, विशाल बिरादार ,बापूसाहेब कांबळे ,आकाश माने, तोफिक पंढरपुरे, टायगर सेनेचे अध्यक्ष जॅकी सावंत, अक्षय सावंत, व इतर छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय पक्षातील सर्व नेते उत्तम बिरादार यांनी बोलताना असे म्हटले की आज अक्षय तृतीया असून व जग ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून अखिल भारतीय छावा संघटनेच्या विविध मागण्या उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आज धरणे आंदोलन संपन्न होत असून आजच्या कार्यक्रमाला वरील मान्यवर उपस्थित होते विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते सर्वांनी शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी भरभरून प्रतिसाद देऊन राज्यातील जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा फार अतिशय अडचणीत असून या शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे पिकल तरी व्यापारी लुटून खात असल्यामुळे पिक विम्यातील काही घोटाळ्यामुळे काही त्रुटी असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे तर या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याचे भारनियमान मुक्त करून वीज बिल माफ करण्यात यावे तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरनामा मध्ये दिलेले वचन पाळून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये चा हप्ता तात्काळ जमा करून महिलांना न्याय देण्यात यावा मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या पीक विम्याच्या घोटाळ्याची चौकशी करून तातडीने दोशींवर कारवाई करण्यात यावी असे आज धरणे आंदोलन करून माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत ही शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक तात्काळ कळवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा असे सर्व उपस्थित मान्यवरांनी संबोधित केले हा आंदोलन अतिशय शांततेत आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीने संपन्न झाले
0 Comments