लक्ष्मीवाडी जि. प. प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांज चिमण पाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांना केले मंत्रमुग्ध!!

शिर्डी (राजकुमार गडकरी) गणेश वंदना, तसेच पाटलांचा बैलगाडा, घाटात केला‌ राडा!!, पाव्हणं जेवलाय काय!!, शांताबाई! इकडून तिकडे मारीती चकरा शांताबाई! झुमक्यावाली पोर!, आदी अनेक गाण्यांवर लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांज चिमण पाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले.

 तसेच उपस्थितही अनेकजण या चिमुकल्यांच्या नृत्यांनी थिरकले. असा हा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लक्ष्मीवाडी तालुका राहता येथील वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ 2025 व सांज  चिमन पाखरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच ओमेश जपे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित वाघिरे,सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावशे शिक्षण विस्ताराधिकारी विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जिजाबा आगलावे, गणेश बनसोडे, सतीश जपे, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा खांडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दीक्षित, उपाध्यक्ष विकास आगलावे , पत्रकार राजकुमार गडकरी, अमर झिंजुर्डे, आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रथम श्री साईबाबांच्या मूर्तीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले . शिर्डी माझे पंढरपुर आरती म्हणण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत गुणवत्ता मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील या कार्यक्रमाला येणार होत्या. मात्र त्या बाहेरगावी असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. असे सांगत या शाळेच्या सुविधेसाठी व शाळेचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपण ग्रामपंचायतीमार्फत नक्कीच प्रयत्न करू ,असे आश्वासन यावेळी दिले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन त्यांनी केले. तर सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे  यांनीही सर्व पारितोषक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच सांज चिमणपाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सदाबहार गीत नृत्यांचा सांज चिमणपाखरांचा हा सदाबहार कार्यक्रम शेकडो उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर झाला. भव्य स्टेज आकर्षक ,विद्युत रोषणाई, चिमुकल्या कलाकारांचे आकर्षक गणवेश, अनेक मान्यवर व शेकडो प्रेक्षक, आकर्षक सजावट, यांच्यामध्ये या चिमुकल्यांनी सांज चिमण पाखराचा हा कार्यक्रम सादर केला. अनेक सिने गीते, लोकगीते ,धार्मिक गीते यावर नृत्य करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,राहता तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षक तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक व मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमासाठी विद्यार्थी तसेच या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक यांनी मोठे परिश्रम घेतले.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments