शिर्डी ( प्रतिनिधी) डॉक्टर बाबासाहेब यांनी देशासाठी खूप महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे विचार ,त्यांचा वारसा कायमस्वरूपी आपण सर्वांनी टिकून ठेवला पाहिजे .त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणंतू अक्षय दिलीपराव आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केले. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे एकता तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने येथील लुंबूनी बुद्ध विहार मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय दिलीपराव आंबेडकर, प्रसिद्ध दिग्दर्शक व कलाकार संजय जाधव , सरपंच ओमेश जपे , सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे,हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी येथे गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भव्य स्टेजवर छोट्या छोट्या मुलांचा भीम गीतांवर आधारित नृत्याचा सदाबहार संस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या छोट्या छोट्या कलाकारांनी प्रसिद्ध भीम गीतांच्या तालावर नृत्य करत उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. नंतर या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग घेणाऱ्या छोट्या छोट्या बाल कलाकांराना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत बक्षीसे देण्यात आली. आकाश वाघमारे यांचा पण? या चित्रपटात कलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी अक्षय आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अक्षय दिलीपराव आंबेडकर साहेब पुढे म्हणाले की, हा नगर जिल्हा माझे आजोळ आहे. त्यामुळे या जिल्ह्याची माझा घनिष्ठ संबंध आहे. मी तीन ते चार वेळा या नगर जिल्ह्यात आलेलो आहे. राहुरी श्रीरामपूर नगर येथे येऊन गेलो आहे. आंबेडकर कुटुंबात माझा जन्म झाला हे माझे धन्य मी समजतो. डॉक्टर बाबासाहेब यांनी महान कार्य केले आहे. या कार्याचा वारसा आपण चालवला पाहिजे. त्यांचे विचार कायमस्वरूपी टिकून ठेवले पाहिजे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
शिक्षण हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. असे सांगत हा छान कार्यक्रम या मंडळींने ठेवला, चिमुकल्या कलाकारांनीही तो चांगल्या प्रकारे सादर केला. त्यासाठी या मंडळांने खूप परिश्रम घेतले . हे सर्व पाहून समाधानही वाटले, असे त्यांनी यावेळी म्हटले. व सर्वांचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी मंडळाचे आकाश वाघमारे.
राहुल वाघमारे. पंकज वाघमारे. मंगेश साळवे. शुभम गोडगे. मंगेश वाघमारे. मनोज वाघमारे. रवी वाघमारे.चेतन वाघमारे. सिद्धार्थ वाघमारे. आदींनी मोठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मंगेश साळवे, आकाश वाघमारे व सुरेश वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुरुष महिला प्रेक्षक उपस्थित होते.
सावळीविहीर येथे एकता तरुण मंडळाच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम,व पारितोषक वितरण समारंभ संपन्न!
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments