शिर्डी प्रतिनिधी
सोयाबीन कापुस व इत्तर शेतमाल हा आधारभूत किमंतीपेक्षा कमी विकत आहे कुठल्याही व्यापारी यांचे वर कायदेशीर कार्यवाही केली जात नाही आज कांदा उत्पादन खर्च एकही ७५ ते ८० हजार येतो या भावाने खर्च सुध्दा निघत नाही तरी सरकारने निर्यात सुरू करावी नाहीतर २५०० रुपये दराने कांदा फेडरेशन माफ॔त खरेदी करावा आज जगामध्ये कांदेची मागणी असताना निर्यात शुल्क व निर्यात बंदी मुळे कांदा उत्पादक शेतकरी संकाटात सापडला आहे यावर्षी कांदा उत्पादनात घट आहे मजूरी दर भरमसाठ वाढले सरकारच धोरण शेतकऱ्यांच मरण शेतकरी यांची कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले परंतु सरकारने अंग काढून घेतले शेतकरी कर्ज भरू शकत नाही कोणत्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारभूत किमंत मिळत नाही तरी सरकारने कांदा फेडरेशन माफ॔त २५०० रूपये दराने तातडीने खरेदी करावा अन्यथा शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकरी तिव्र अंदोलन छेडणार असल्याचे विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे.
0 Comments