हिंदू एकता आंदोलन पक्ष. आगामी काळातील येणाऱ्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढविणार. रामसिंग बावरी.

हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न
शिर्डी (प्रतिनिधी) ः हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा राज्यातील पदाधिकाररी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.१७ एप्रिल २०२५ रोजी शिर्डी येथे संपन्न झाल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी दिली.

मार्गदर्शन करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी म्हणाले, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार हिंदूंचा हरण करीत आहे. वक्फ बोर्डचा कायदा पास झाल्यानंतर प.बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर अत्यंत गंभीर हल्ले होत आहेत. त्यांच्या संपत्तीची लूट होत आहे. तेथील ममता बॅनर्जीचे सरकार अपयश ठरलेले आहे. म्हणून हिंदूंना मारक असलेलं पश्चिम बंगालमधील सरकार पंतप्रधान व राष्ट्रपतींनी बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी,  असे म्हटले यावर मेळाव्यातील पदाधिकार्‍यांनी एकमताने पाठिंबा दिला. तसेच कुटुंब नियोजन सर्व धर्मियांना सक्तीचे करावे. कारण ‘हम दो हमारे दो’ म्हणणारे आम्ही आहोत. तर मुस्लिम म्हणतात, हम पाँच हमारे पचीस. यामुळे लोकसंख्या १४२ कोटीच्या आसपास गेली आहे. म्हणून भारत सरकारने सक्तीचे कुटुंब नियोजन व समान नागरी कायदा लागू करावा. तसेच हिंदू एकता आंदोलन संघटना व पक्ष हे एकच असून त्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे हेच असल्याचेही बावरी म्हणाले. त्यासंदर्भात कोल्हापूर व सांगली येथे पक्षाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे म्हणाले, काही महिन्यापूर्वी शिर्डी येथे भाजपाचे अधिवेशन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अधिवेशन शिर्डी येथेच घेण्यात आले. साईबाबांच्या शिर्डीमध्ये अधिवेशन झाल्यानंतर पक्षबांधणी मजबूत होते. आणि शिर्डी येथे घंटा वाजल्यानंतर त्या घंटेचा आवाज महाराष्ट्र घुमतो. त्यामुळेच आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे घेतले. कारण येणार्‍या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्व हे हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच असल्याचे दिसून येेेते. त्यामुळेच राज्यातील कार्यकारिणी आम्ही युवकांच्या हातात दिली आहे. गेल्या ३० वर्षे राज्यात समान नागरी कायद्यासाठी, काश्मीरचे ३७० वे कलम रद्द, गोहत्याबंदी व श्रीराम मंदिर अयोध्येत होण्यासाठी व भयमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक आंदोलन केली. त्या आंदोलनाला यश आले.
या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये सांगली प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.बाळासाहेब वाघमोडे, सांगली प्रदेश संघटक राहुल मोरे, दिपक ढवळे-प्रदेश सचिव मिरज-सांगली, संतोष जगताप-महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, श्रीकांत कापसे-पुणे जिल्हा अध्यक्ष, अजय माळी-धुळे युवा अध्यक्ष, किरणसिंग पवार-नाशिक शहराध्यक्ष,  अनिल उबेद-सांगली जिल्हा उपाध्यक्ष, दिलीप खैरनार, पिंपळनेर (साकरी) तालुकाध्यक्ष, अनिल देवकर-जळगाव जिल्हाप्रमुख, जितेंद्र सोनार-धुळे जिल्हा सरचिटणीस, नाशिक जिल्हाध्यक्षपदी-किशोर बागमार, महिला आघाडी नाशिकप्रमुख-प्रियंका अहिरराव, चंद्रकांत सोनवणे-संभाजीनगर जिल्हाप्रमुख, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज मराठे, मनोज मराठे-नाशिक शहर संघटक, सोमनाथ येंदे-नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व अन्य अनेक पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांना शाल व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्याबद्दल डॉ. रवींद्र कुटे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष लांडे व साकरीचे माजी सरपंच दिलीप खैरनार यांनी हिंदू एकता आंदोलन पक्षात प्रवेश केला. मेळाव्यासाठी जळगाव, नाशिक, ठाणे, पुणे, सांगली (मिरज), नांदेड, सोलापूर, पिंपळनेर, साकरी, धुळे, चाळीसगाव, वैजापूर, संभाजीनगर व इतर जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर शहराध्यक्ष बी.एम.पवार, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, जिल्हा सरचिटणीस सोपानराव पागिरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे, जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय मंडलिक, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, अनिल छाबडा, डॉ.रविंद्र कुटे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष शिवाजी फोफसे, नेवासा तालुकाध्यक्ष अविनोश कनगरे, वैजापूर तालुकाध्यक्ष अशोक तनपुरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments