त्यासाठी उत्सव काळात साई भक्तांना विना प्रतीक्षा प्रसाद भोजनाचा लाभ मिळावा म्हणून येथे मनुष्यबळ ज्यादा नेमण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे श्री राम नवमी निमित्त शिर्डीला येणाऱ्या साई पालखी तसेच साई पदयात्री व साई भक्तांना साई दर्शनापूर्वी महाप्रसाद भोजनाचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांनी साईप्रसादालयात दूरध्वनीवर संपर्क साधून प्रथम कळवले तर साई दर्शनापूर्वीही साई भक्तांना महाप्रसाद भोजनाचा लाभ साईप्रसादालयात मिळणार आहे. संस्थांनच्या साईप्रसादालयात रामनवमी निमित्त तीन दिवस मिष्ठान्न महाप्रसाद भोजन राहणार आहे. शुक्रवारी 4 एप्रिल 2025 रोजी सुमारे 34 हजार 664 साई भक्तांनी साईप्रसादालयात महाप्रसाद भोजन घेतले. तर शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे 23 हजार 62 साई भक्तांनी साईप्रसाद भोजनाचा लाभ घेतला. रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद भोजन सुरू राहणार आहे. रविवार सहा एप्रिल 2025 श्रीराम नवमीच्या मुख्य दिवशी साईप्रसादालयात गुळाची जिलेबी, दोन भाजी भात साधी डाळ व चपाती असा महाप्रसाद भोजन राहणार असून सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी साईप्रसादालयात बालुशाही दोन भाजी भात सांबर चपाती असा मेनू महाप्रसाद भोजनात राहणार आहे. साईप्रसादालात साईबाबांचा महाप्रसाद घेण्यासाठी साई भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मात्र साई संस्थान व साईप्रसादालय व्यवस्थापनाचे नियोजन व्यवस्थित असल्यामुळे सर्व साई भक्तांना विनविलंब महाप्रसाद भोजन मिळत आहे. त्यामुळे साई भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments