दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.21-भरधाव अज्ञात वाहनाने मोटारसायकलला मागून जोरदार धडक देऊन मोटारसायकल वर पुढे बसलेल्या पाच वर्षीय मुलीला हवेत उडवून चालक पित्याला पन्नास फूट फरफटत नेल्या ची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जरंडी गावाजवळ सोयगाव-बनोटी रस्त्यावर घडली या भयंकर अपघातात बाप व मुलगी जागीच ठार झाले तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
अजय रघुनाथ राठोड(वय 32 रा.न्हावितांडा) व वैशाली अजय राठोड (वय 08 रा.न्हावी तांडा) असे अपघातात जागीच ठार झालेली असून काजल अजय राठोड(वय 10) गंभीर जखमी झाली आहे हे तिघेही जरंडी येथून निंबायती(न्हावी तांडा) येथे मोटारसायकल क्र-एम एच-19 ए बी- 3718 वरून जात असताना सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडी गावाजवळ मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडविले यामध्ये मृत वैशाली राठोड हिस या भरधाव वाहनाने हवेत उडवून अजय राठोड(वय 32) यास पन्नास फूट फरफटत घेऊन गेले तर काजल ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य केले
दरम्यान भरधाव अज्ञात वाहनधारकाने वाहनासह घटनास्थळवरून पळ काढला होता निंबायती येथील पोलीस पाटील मूलचंद राठोड, भागचंद चव्हाण,राजू पाटील,गजानन राठोड, पारस राठोड, बबलू राठोड, नाना सुस्ते, जरंडीचे माजी सरपंच समाधान तायडे, माजी उपसरपंच सुनील पवार,विजय चौधरी,राहुल चौधरी, सचिन पाटील,सचिन महाजन, स्वप्नील महाजन, आदींनी घटनास्थळवरून जखमी मुलगी काजल राठोड हिस जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचारासाठी दाखल करून दोन्ही अपघातात मृत झालेल्याचे मृतदेह शवविच्छेदन साठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रात्री उशिरा अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.
----अवघ्या तीन मिनिटाच्या अंतरावर होता गावाचा फाटा
सोयगाव-बनोटी रस्त्याच्या घटनास्थळपासून अवघ्या तीन मिनिटाच्या अंतरावर निंबायती (न्हावीतांडा) गावाचा फाटा होता परंतु तीन मिनिटे आधीच भरधाव वाहनाने उडविल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे निंबायती(न्हावी तांडा) ,गावात हळहळ व्यक्त होत आहे.मृत अजमल राठोडच्या पश्चात वडील,पत्नी,भाऊ एक मुलगा, एक मुलगी(अपघातात जखमी असलेली) असा परिवार आहे.
0 Comments